Tarun Bharat

जिल्हास्तरीय कुस्ती, कराटे स्पर्धेत मराठी विद्यानिकेतनचे यश

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती व कराटे स्पर्धेत मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी 3 सुवर्ण व 4 रौप्य पदके पटकावून यश संपादन केले तर क्रीडा शिक्षिका पूजा संताजी यांची दसरा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी वेटलिंफ्टिंगमध्ये निवड झाली. जिल्हा स्पोर्ट्स हॉस्टेलच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या कुस्ती व कराटे स्पर्धेत मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडू कुस्तीमध्ये 33 किलो वजनी गटात गौतमी पाटीप, 50 किलो वजनी गटात सिद्धी निलजकर, 42 किलो वजनी गटात वर्धन पाटील यांनी सुवर्ण तर 33 किलो वजनी गटात बालाजी पाटीलने रौप्य पदक पटकाविले.

कराटे स्पर्धेत 48 किलो वजनी गटात कुनाल बेन्नाळकरने रौप्य पदक, 25 किलो वजनी गटात परम पाटीलने रौप्य पदक, 32 किलो वजनी गटात तन्मय मुचंडी याने रौप्य पदक पटकाविले. सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडुंची राज्यस्तरिय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरिय दसरा क्रिडा स्पर्धेत शाळेच्या क्रीडा शिक्षिका पुजा संताजी यांची वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुजा या म्हैसूर येथे होणाऱया दसरा स्पर्धेसाठी रवाना झाल्या आहेत. या सर्व खेळाडुंना मुख्याध्यापक आय. व्ही. मोरे, जी. व्ही. सावंत, शिक्षण संयोजिका व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related Stories

ऑटोनगरमध्ये प्लास्टिक जप्तीची कारवाई

Amit Kulkarni

बहावा बहरला… पीक पाणीही बहरणार

Omkar B

खड्डय़ांतील पाण्यामुळे वाहनधारकांची कसरत

Omkar B

अनगोळ येथील नागरिक विजेच्या समस्येने हैराण

Amit Kulkarni

कर्मचारी व कामगारांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर

Amit Kulkarni

गौड सारस्वत ब्राह्मण समाजाची वार्षिकसभा खेळीमेळीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!