क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खाते व सरकारी उर्दू हायस्कूल, गांधीनगर बेळगाव आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सुयश मिळविल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
17 वर्षाखालील गटात नम्रता शहापूरकरने भालाफेकमध्ये प्रथम, नेहा धामणेकरने थाळीफेकमध्ये द्वितीय, 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक, चैतन्या जायाण्णाचे 1500 मी. धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक, शीतल हलगेकरने उंच उडीत तृतीय क्रमांक पटकाविला. 14 वर्षाखालील प्राथमिक गटात स्मितल गोवेकरने 100 मी. व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, रक्षिता सावंतने 600 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम तर 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय, गौरी मादाक्काचेने थाळीफेकमध्ये द्वितीय, सानिका जायण्णाचेने उंच उडीत द्वितीय क्रमांक पटकाविला. 4ƒ100 मी. रिले स्पर्धेत द्वितीय, कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद, थ्रोबॉलमध्ये विजेतेपद पटकाविले. वरील सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक सचिन कुडची यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक जे. यू. घाडी व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले.