क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले तर भिमू काटेला 15 गुणांसह वैयक्तिक विजेतेपद मिळाले.
जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत मुलींच्या कबड्डी संघाने विजेतेपद, मुलांच्या खो-खो संघाने विजेतेपद, 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कार्तिक पावसकरने प्रथम क्रमांक तर लांब उडीत द्वितीय क्रमांक, समर्थ हावळने तृतीय क्रमांक, गोळाफेक, थाळीफेक व हातोडाफेकमध्ये भिमू काटेने प्रथम क्रमांक पटकावित वैयक्तिक विजेतेपद मिळविले. लांब उडीमध्ये श्रीयश सुतारने तृतीय क्रमांक, हातोडाफेकमध्ये कार्तिक पावसकरने द्वितीय क्रमांक, थाळीफेक व भालाफेकमध्ये आकाश नायकरने तृतिय क्रमांक, मुलींच्या गटात 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रियांका कोलेकरने द्वितीय क्रमांक पटकाविला.
वरील सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक निरंजन कर्लेकर यांचे मार्गदर्शन तर विजय नंदीहळ्ळी, मुख्याध्यापक एस. जी. हिरेमठ, आदर्शचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, विनायक कंग्राळकर यांचे प्रोत्साहन लाभले
आहे.