क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मंगळूर येथे कर्नाटक राज्य रायफल असोसिएशन आयोजित व हुबळी येथे खुल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शेया देशपांडे, ज्योती बागेकर यांनी यश संपादन केले. या स्पर्धेत 10 मी. एअर रायफल नेमबाजीत वरिष्ठ गटात ज्योती अण्णा बागेकरने कांस्य तर हुबळी येथील खुल्या शुटींग स्पर्धेत वरि÷ गटात सुवर्ण व रौप्य पटकाविले. ज्योती, श्रेया देशपांडे व अक्षता चौगुले या तिघींनी सांघिक सुवर्णपदक पटकाविले. वैयक्तिक प्रकारामध्ये ज्योती बागेकरने रौप्य मिळविले. त्या कोल्हापुरातील ड्रीम ऑलिम्पियन नेमबाजी अकॅडमी गांधीनगर येथे सराव करीत असून, त्यांना प्रशिक्षक रविचंद्रन बाळेहोसूर व अनुराधा खुडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर समीर मुलांनी अण्णा बागेकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.