वार्ताहर /किणये
बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी बेळगुंदी ग्रामीण विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. स्नेहा शहापूरकर 600 मी. धावणे प्रथम क्रमांक तसेच अडथळय़ाच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळविला. लांब उडीमध्ये गायत्री मोरे प्रथम क्रमांक, कुस्तीत प्रज्वल कणबरकर प्रथम, रवळनाथ कणबरकर याने कुस्ती, गोळाफेक, थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
मुलींचा थ्रो बॉल संघ प्रथम
मुलींच्या थ्रो बॉल संघाने प्रथम क्रमांक व मुलांच्या थ्रो बॉल संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.