Tarun Bharat

रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

अचूकतेने लक्ष्य गाठण्यात मिळविले यश ः डीआरडीओ, लष्कराकडून संयुक्त निर्मिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे स्वदेशी बनावटीच्या अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्राची (एटीजीएम) यशस्वी चाचणी केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने बुधवारी दिली. महाराष्ट्रातील अहमदनगरच्या केके रेंजमधील अर्जुन बॅटल टँकमधून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने पूर्ण अचूकतेने मारा करून निर्धारित लक्ष्य सहज भेदले. टेलिमेट्री प्रणालीने अँटी-टँक मिसाईलच्या उड्डाणाची समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे. या चाचणीत एटीजीएमने अत्यंत अचूकतेने लक्ष्य गाठण्यात यश मिळवत ते पूर्ण केले.

यशस्वी चाचणी केल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय लष्कर आणि संशोधन व विकास संस्थेचे अभिनंदन केले असून ही देशासाठी एक मोठी संधी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यामुळे सैन्याची ताकद वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या प्रकल्पाशी संबंधित सर्वजण अभिनंदनास पात्र असल्याचेही ते म्हणाले.

Related Stories

बांगलादेशपर्यंतच्या डीझेल पाईपलाईचे उद्घाटन

Patil_p

अफगाणिस्तानातील स्थितीवर पीएम मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये मेजरची आत्महत्या

datta jadhav

‘सप’ची सहानुभूती दहशतवाद्यांसोबत

Patil_p

मुलायम यादवांच्या सुनेकडून राम मंदिर उभारणीसाठी देणगी

Patil_p

छतरी गावावर ‘केक’ची छाया

Patil_p