Tarun Bharat

नऊ महिन्यांच्या बालिकेवर मेंदू शस्त्रक्रिया यशस्वी

प्रतिनिधी /पणजी

गोव्याला येण्यासाठीच्या विमानात चढताना घसरून पडल्याने मेंदूला जबर दुखापत झालेल्या नऊ महिन्यांच्या बालिकेवर नुकतीच मणिपाल इस्पितळात यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यात आले.

सदर बालिकेवर करण्यात आलेल्या या अवघड शस्त्रक्रियेविषयी गोवा मणिपाल इस्पितळातील मेंदूशल्यशास्त्रचिकित्सक डॉ. ओंकार चुरी यांनी सविस्तर माहिती दिली. या बालिकेला तिचे पालक थेट विमानतळावरून इस्पितळात घेऊन आले होते. त्याची तपासणी केली तेव्हा त्याची उजवी बाजू संपूर्ण लुळी पडली होती. प्रयत्न करुनही त्याला डोळे उघडता येत नव्हते. ते बाळ केवळ हुंदके देत होते. त्याच्या एका डोळ्याची बाहुली लहान तर दुसरी मोठी झाली होती. याचाच अर्थ रक्तप्रवाहात अडसर निर्माण झाल्यामुळे तिच्या मेंदूवर प्रचंड दाब पडला होता.

आपत्कालीन स्थितीत तिचा सीटी स्पॅन करण्यात आला. त्यावेळी मेंदूच्या  डाव्या बाजूला रक्ताची अजस्त्र गुठळी दिसून आली. त्यातूनच सातत्याने रक्तस्त्राव  होत होता आणि घटिकेगणिक बाळासाठी धोकादायक ठरत होता.

अशावेळी त्वरित निदान आणि त्यानुसार शस्त्रक्रिया केल्यास जीवावरचे संकट  टळू शकते. परंतु इथे बाळाचा काही तासांचा वेळ प्रवासात गेल्यामुळे जीवावर  बेतणारी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातून जीवावरील धोका 33 टक्केपर्यंत वाढला होता. अशी बिकट परिस्थिती असतानाही पालक शस्त्रक्रियेसाठी तयार  झाले.

त्यामुळे पुढील प्रक्रियेने वेग घेतला. वरिष्ठ भूलतज्ञ डॉ. दालिया,    बालोपचारतज्ज डॉ. नेथन आदींनी चर्चा करून वेगाने उपचार सुरू केले. लगेच  शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. मध्यरात्रीनंतर सुरू झालेली ही शस्त्रक्रिया अगदी  सकाळपर्यंत चालली. तीन दिवसांनंतर बाळाच्या स्थितीत घरी पाठवण्याएवढी सुधारणा झाली व    त्यानंतर कोणताही त्रास न होता बाळासह ते गावाकडे रवाना झाले.

Related Stories

पर्यटनखात्यात मायकल लोबोंची ढवळाढवळ खपवून घेणार नाही

Patil_p

ड्रग्ज डिलर्सना ‘नो बेल, डायरेक्ट जेल’

Amit Kulkarni

लेक्चर बेसिस शिक्षकांची पगारवाढ करावी

Amit Kulkarni

आडपई येथे 26 रोजी सायक्लींग मॅराथॉन स्पर्धा

Amit Kulkarni

ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संभ्रमात

Amit Kulkarni

गोव्यात ऑक्सिजनअभावी 21 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav