Tarun Bharat

ISRO ने रचला इतिहास; बाहुबली ‘LVM-3’चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’ने आपले सर्वात वजनदार रॉकेट ‘LVM-3’ चे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी केले. सतिश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून मध्यरात्री 12 वाजून 7 मिनीटांनी हे रॉकेट जवळपास 36 व्यवसायिक रॉकेटसह आकाशात झेपावले होते. हे रॉकेट आकाशात झेपावल्यामुळे भारतानं ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे.

‘LVM-3’ हे तीन-स्टेज रॉकेट आहे. ज्यामध्ये दोन सॉलिड मोटर स्टेप्स ऑन आणि एक प्रोपोलेंट स्टेज आहे. मध्यभागी एक क्रायोजेनिक स्टेज आहे. या वजनी रूपामुळे त्याला इस्रोचा बाहुबली असेही म्हणतात. पूर्वी या रॉकेटला GSLV मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होते. या उपग्रहाद्वारे एका खासगी उपग्रह कंपनी असलेल्या वन वेबच्या 5796 किलोच्या 36 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. यानंतर इस्रोचे वन वेब इंडिया-1 हे मिशन पूर्ण झाले असून, भारतीयांसाठी ही मोठी दिवाळी भेट आहे. या मिशनसाठी 24 तासांचा काउंटडाऊन ठेवण्यात आला होता.

हे रॉकेट 43.5 मीटर लांब असून, 8,000 किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात ‘LVM-3’ द्वारे 36 वन वेब उपग्रहांचा आणखी एक सेट लाँच केला जाईल, असे इस्रोच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

Related Stories

बिल गेट्स यांचा जगाला भावनिक संदेश; म्हणाले, “माझ्या अगदी जवळच्या…”

Archana Banage

जिल्ह्यात आतापर्यंत 720 कोटींचा जीएसटी महसूल जमा

Abhijeet Khandekar

लसीकरणासाठी प्रयत्न करा

Amit Kulkarni

प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे अध्यक्ष मुख्य अतिथी

Patil_p

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 554 वर

Omkar B

ईडब्ल्यूएस आरक्षणातील जाचक अटीचा विद्यार्थ्यांना फटका

Archana Banage