सध्या सोशल मिडियावर एक भन्नाट व्हिडिओ प्रसारित होत आहे. लक्षावधी लोकांनी तो पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडिओत एका विशाल ड्रोनचे दर्शन आपल्याला घडते. या ड्रोनमध्ये दोन प्रवासीही आहेत. त्यामुळे याला ड्रोन हेलिकॉप्टर असे संबोधण्यात आले आहे. अलीकडच्या काळात ड्रोनचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर वाढलेला आहे. अगदी सुपारीच्या आकाराच्या छोटय़ा ड्रोनपासून विमानापेक्षाही मोठय़ा ड्रोन्सचा संचार आकाशात सर्वत्र होत आहे. तथापि, प्रवाशांना घेऊन जाणारे ड्रोन प्रथमच या व्हिडिओत पहावयास मिळत आहे.
ड्रोनच्या साहाय्याने औषधे, लसी, रोपणासाठी मानवी अवयव इत्यादींची वाहतूक करणे आता नवीन राहिलेले नाही. आरोग्य क्षेत्रात तर ड्रोनमुळे नवी क्रांती घडताना दिसते आहे. तथापि, भविष्यकाळात माणसाच्या प्रवासासाठीही ड्रोन उपयोगात आणता येईल, याची नांदी या नव्या प्रयोगाने झाली आहे.
चालकरहित कार्स बऱयाच काळापासून आपल्याला माहीत आहेत. तथापि, अत्यंत प्रगत देशांमध्येही चालकरहित कारचा प्रयोग म्हणावा तसा यशस्वी झालेला नाही. हे तंत्रज्ञान विकसित होऊन किमान दहा वर्षांचा कालावधी लोटला असूनही अद्याप चालकरहित कार मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांवर दिसत नाहीत. पण ड्रोनच्या तंत्रज्ञानात इतक्मया झपाटय़ाने सुधारणा होत आहे, की प्रवासासाठी चालकरहित ड्रोनचा उपयोग चालकरहित कारला मागे टाकेल, अशी स्थिती आहे.
चालकरहित विमानातून प्रवास करणे अद्यापही धोक्मयाचे मानले जाते. कारण चुकून या विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली तर मात्र विमान सांभाळण्यासाठी कोणीही उपस्थित नसते. मानवी बुद्धीचा वापर करून विमानावर नियंत्रण ठेवणे जसे चालकाला शक्मय असते, तसे ड्रोनच्याबाबतीत होत नाही. त्यामुळे ड्रोन कोसळून मृत्यू अटळ असतो. परिणामी अद्यापही चालकरहित ड्रोनमधून प्रवास करण्याचे धाडस सहसा कोणीही करत नाहीत. मात्र, या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती तसे करताना दिसून येतात. त्यामुळेच हा व्हिडिओ लोकप्रिय झालेला आहे.