Successful surgery at Dodamarg Rural Hospital
दोडामार्ग ग्रामीण रुगणालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे ( स्त्री रोगतज्ज्ञ ) यांच्या मार्गदर्शनाखाली एका महिलेच्या गर्भ पिशवीला असलेली गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया आज सोमवारी ग्रामीण रुग्णालयात पार पडली.डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल एक किलोची ही गाठ होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. ऐवळे यांना भुलतज्ज्ञ डॉ. महांबरे तसेच डॉ. शाहीन, सिस्टर ललिता माजीक व अन्य स्टाफचे सहकार्य मिळाले.
दोडामार्ग – प्रतिनिधी