दोडामार्ग / वार्ताहर-
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या एका ४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीशी निगडित शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याची किमया रुग्णालयातील डॉक्टरर्स, नर्सेस आदींनी केली.तालुक्यातील एका गावातील महिलेच्या गर्भपिशवीला गाठी जमल्याने त्या महिलेला खूप त्रास होत होता. सदर महिला व तिच्या कुटुंबीय यांनी अनेक ठिकाणी उपचार करून घेतले परंतु त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.
मात्र अखेरीस दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले असता रुग्णालयातील सर्व डॉक्टरर्स, नर्सेस, भुलतज्ञ तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी या महिलेवरील गर्भपिशवीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. दरम्यान रूग्णालयाच्या सर्वांचे सदर महिलेच्या कुटुंबीयांनी तसेच नागरिकांनी कौतुक केले.