Tarun Bharat

डीआरडीओकडून क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम क्षेपणास्त्र

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संरक्षण संशोधन अन् विकास संघटनेने (डीआरडीओ) गुरुवारी पोर्टेबल लाँचरद्वारे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम मिसाइलचे यशस्वी परीक्षण केले आहे. ओडिशाच्या चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्टिंग रेंजमध्ये क्षेपणास्त्राच्या दोन चाचण्या पार पडल्या आहेत. हे क्षेपणास्त्र म्हणजे मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम असून डीआरडीओने विकसित केली आहे.

या क्षेपणास्त्र यंत्रणेत अनेक नव्या तंत्रज्ञानांचा समावेश करण्यात आला आहे. यात मिनिएचुराइज्ड रिऍक्शन कंट्रोल सिस्टीम आणि इंटीग्रेटेड एव्हियोनिक्स सामील आहे. परीक्षणादरम्यान क्षेपणास्त्राने स्वतःच्या लक्ष्याचा अचूक भेद केला आहे. डीआरडीओनुसार हे क्षेपणास्त्र कमी पल्ल्यावर कमी उंचीवरील हवाई धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र आणि लाँचर सहजपणे कुठेही नेता येईल अशाप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे. व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम क्षेपणास्त्रs कुठल्याही मोठय़ा शहराच्या किंवा सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाणाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत.

Related Stories

अल्पवयीन मुस्लिम मुलीचा निकाह वैध : हायकोर्ट

Archana Banage

तामिळनाडूत जलिकट्टूने घेतले 3 बळी

Patil_p

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी

Tousif Mujawar

हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान

Patil_p

काँग्रेसला दररोज 4 क्विंटल शिव्या देतात मोदी

Patil_p

आसाम-त्रिपुरा सीमेवर २४०० किलो गांजा जप्त, दोघेजण ताब्यात

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!