नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संस्था इस्रोने शुक्रवारी सकाळी ह्युमन रेटेड सॉलिड रॉकेट बुस्टर म्हणजेच एचएस200 चे यशस्वी परीक्षण पेले आहे. या रॉकेटला आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सकाळी 7.20 वाजता प्रक्षेपित करण्यात आले. हे रॉकेट गगनयान मोहिमेसाठी तयार करण्यात आले आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनुसार एचएस200 रॉकेट बुस्टर जीएसएलव्ही एमके 3 सॅटेलाइन लाँच व्हीकलच्या एस200 रॉकेट बुस्टरचे ह्युमन रेटेड व्हर्जन आहे प्रक्षेपण यानाच्या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत हे परीक्षण करण्यात आले आहे. गगनयान मोहिमेकरता हे परीक्षण मैलाचा दगड ठरणार आहे.