ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Successfully launch of NASA’s Artemis-1 नासाची चंद्रमोहीम असलेल्या ‘आर्टेमिस-1’ चे आज यशस्वीरिता प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून हे रॉकेट झेपावले. नासाचा हा तिसरा प्रयत्न आहे. यापूर्वी 29 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबर रोजी ‘आर्टेमिस-1’ च्या प्रक्षेपणाचे प्रयत्न झाले होते, परंतु तांत्रिक अडचणी आणि खराब हवामानामुळे ते पुढे ढकलावे लागले होते.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, नासाने या मिशनच्या माध्यमातून ओरियन अंतराळयान चंद्रावर पाठवले आहे. हे रॉकेट 25 दिवस चंद्रावर प्रवास केल्यानंतर परत येईल. अमेरिकेच्या 50 वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. सोमवारी ओरियन चंद्राच्या पृष्ठभागाजवळून 96.5 किलोमीटर अंतर पार करेल. तसेच उपग्रहांना चंद्राच्या कक्षेत सोडणार आहे. अंतराळातील प्रवास संपल्यावर हे रॉकेट 11 डिसेंबरला प्रशांत महासागरात कोसळेल.
अधिक वाचा : मलिकांच्या अडचणी वाढणार; ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
रॉकेट मानवाच्या अंतराळ प्रवासासाठी बनवण्यात आले आहे. हे रॉकेट प्रथम पृथ्वीपासून चंद्रापर्यंत 4.50 लाख किमी प्रवास करेल. एवढा लांब प्रवास करणारे हे पहिले रॉकेट असेल. दरम्यान, मुख्य चंद्रमोहिमेसाठी हे एक चाचणी उड्डाण आहे. ज्यामध्ये एकही अंतराळवीर पाठवला जाणार नाही. या उड्डाणामुळे चंद्राभोवतीची परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही? हे जाणून घेतले जाईल. जर हे मिशन यशस्वी झाले तर 2025 पर्यंत अंतराळवीर चंद्रावर पाठवले जातील. या मोहिमेनंतरच नासाचे शास्त्रज्ञ चंद्रावर पोहोचण्यासाठी इतर आवश्यक तंत्रे विकसित करतील. जेणेकरून चंद्राच्या पलीकडे जाऊन मंगळाचा प्रवासही करता येईल.