Tarun Bharat

असा असावा निर्धार

फरिदाबाद येथील किरण कनौजिया नामक युवतीची ही प्रेरणादायी कहाणी आहे. अत्यंत गरीब परिवारात जन्मलेल्या किरण यांनी स्वबळावर शिक्षण पूर्ण करून इन्फोसिससारख्या प्रसिद्ध कंपनीत नोकरी मिळविली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आकाश ठेंगणे झालेले होते. परंतु, एक दिवस रेल्वेतून प्रवास करताना अपघातामुळे त्या रेल्वेट्रकवर पडल्या आणि त्यांचा एक पाय तुटल्यामुळे निकामी झाला. संपूर्ण कुटुंबावर जणू आकाशच कोसळले होते. तथापि, तशाही परिस्थितीत निर्धाराने मार्ग काढत किरण आज दिव्यांगांसाठी असलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये नाव कमावत आहेत. त्या भारताच्या पहिल्या महिला ब्लेडरनर म्हणून प्रसिद्ध आहेत.

अपघातातून बरे झाल्यानंतर त्यांनी आपले करियर पुन्हा सावरण्याचा निर्धार केला. नोकरीबरोबरच त्यांनी ऍथलेटिक्समध्ये सराव सुरू केला. एका पायावर पळणे, पोहणे, सायकलिंग करणे इत्यादी अनेक क्रीडा प्रकारांमध्ये आज त्यांनी मोठी प्रगती केलेली आहे. इन्फोसिसमध्ये नोकरी मिळाल्यानंतर त्या फरिदाबादहून हैद्राबादला नोकरीच्या ठिकाणी जात असतानाच त्यांना हा भयानक अपघात झाला होता. अपघातातून बरे होण्यास त्यांना सहा महिने लागले. त्यामुळे इन्फोसिसमध्ये नोकरी करणे जमू शकले नाही. तथापि, अन्यत्र आता त्यांना काम मिळालेले आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांचे नाव आज देशभर गाजते आहे. त्यांचा निर्धार टिकवून धरण्यात त्यांच्या वडिलांचे योगदान मोठे असल्याचे त्या म्हणतात. त्यांच्या वडिलांनी त्यांना सुधा चंद्रन यांचे उदाहरण दिले होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्यावतीने त्यांना मेडिटेशनचे प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. आता त्यांना कृत्रिम पाय बसविण्यात आला आहे आणि या पायावरच त्या क्रीडा क्षेत्रात प्रगती करत आहेत.

Related Stories

विचित्र आजार असणारा मुलगा

Patil_p

इटीएफमध्ये 4,814 कोटी रुपयांची गुंतवणूक

Patil_p

चिंता वाढली : बीएसएफच्या आणखी 30 जवानांना कोरोनाची लागण  

Tousif Mujawar

नोएडात 78 टक्के कोरोना रुग्णांचे मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने

datta jadhav

कोरोना निर्बंध 31 जानेवारीपर्यंत

Patil_p

देशात आतापर्यंत 59 लाख बाधित

Patil_p