कसबे डिग्रज / वार्ताहर
कसबे डिग्रज येथील आपटे मळा परिसरात एका ठिकाणी लावलेल्या बुलेटने अचानक पेट घेतला. या आगीमध्ये बुलेट जळून खाक झाली.बुलेटचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. बुलेट पेटलेली असताना जवळून जाणारे टेम्पो चालक सचिन गोंदकर(चित्रवाले) यांनी धाडस करून आग विझवली. यावेळी संपूर्ण बुलेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. आगीचे व धुराचे लोट उठले होते. सचिन गोंदकर यांनी आग विझवली नसती तर नजिक असणाऱ्या उसास आग लागण्याची शक्यता निर्माण झाली असती.दरम्यान या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.