स्थानिक लोक दहशतीत
स्लोवाकिया या देशात एका नदीचे पाणी रहस्यमय स्वरुपात नारिंगी रंगाचे झाले आहे. या प्रकाराला स्लोवाकियामध्ये एका ‘आपत्ती’च्या स्वरुपातही पाहिले जात आहे. नदीच्या पाण्याचा रंग अचानक बदलल्याने लोक हैराण झाले आहेत.
पूर्व स्लोवाकियामध्ये एका लोहखनिजाच्या खाणीतील प्रदूषित पाण्यामुळे तेथीला स्लाना नदीला नारिंगी रंग प्राप्त झाला आहे. यामुळे वन्यजीवांनाही त्रास सहन करावा लागलतोय. नदीचा रंग बदलल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. स्लाना नदीतील दूषित पाणी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर नदीच्या काठावर वसलेल्या गावांमधील लोक देखील या आपत्तीमुळे प्रभावित होत आहेत.
निज्ना या गावात राहणाऱया लोकांनुसार सद्यकाळात नदीत कुठलेच जीव नाहीत, नदीत केवळ आणि केवळ लोह दिसून येत आहे. हा रंग 2008 मध्ये खनन करण्यात आलेल्या एका आयर्न पॉकेटचा असून जो आतापर्यंत नदीच्या तळाला होता. परंतु पूरामुळे तो आता प्रवाहात मिसळला गेला आहे. पाण्यात अधिक प्रमाणात लोक मिसळले गेल्याने पाण्याचा रंग नारिंगी झाला असला तरीही हे पाणी विषारी नसल्याचा दावा रुडने बेन या खाणकंपनीने केला आहे.
कंपनीने नदीची स्थिती सुधारण्यासाठी स्लोवाकियाच्या अर्थ मंत्रालयाकडून 2 लाख युरोंच्या निधीची मागणी केली आहे. तर नदीत अत्यंत धोकादायक पदार्थ असल्याचे स्लोवाकियाच्या पर्यावरण मंत्रालयाचे म्हणणे आहे.