प्रतिनिधी/ बेळगाव
मुळचे बेळगावचे व सध्या फ्लॉरिडा येथील रहिवासी सुधीर कुलकर्णी यांनी जीआयटी व व्हिटीयु येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुधीर हे इंटेल इन्क कार्पोरेशनचे जनरल मॅनेजर आहेत.
बेळगावला आल्यावेळी त्यांनी जीआयटी आणि व्हिटीयुमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्वयंम विकास, संभाषण कौशल्य, परदेशातील जीवन शैली व मंदिच्या काळात घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. संगणक क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांना सहकार्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.