Tarun Bharat

शिल्लक ऊस प्रश्नी युवक राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

दिघंची/ प्रतिनिधी

साखर कारखान्यच्या ढिसाळ नियोजनामुळे उसाला तोड न मिळाल्याने अनेक ठिकाणी ऊस अजून शेतातच आहे.लवकरात लवकर प्रशासनाने त्याचा सर्वे करून शेतकऱ्यांना उसाला तोडणी द्यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा युवक राष्ट्रवादी कडून देण्यात आला आहे.याबाबतचे निवेदन युवक राष्ट्रवादी चे तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश गुरव यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की तोडणी अभावी गेली 18 महिने ऊस शेतात आह. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.गेली 18 महिने ऊस शेतात च असल्याने व तोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना दुसरे पिक देखील घेत येत नाही.त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येईल.

तरी शासनाने तोडणी शिवाय शिल्लक राहिलेल्या उसाचा सर्व्हे करून त्याची माहिती संबंधित कारखान्याला देऊन तोडणी द्यावी.अन्यथा शिल्लक उसाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.आटपाडी तालुक्यातील शिल्लक राहिलेला ऊस तोडल्याशिवाय कारखाना बंद करू नये .उर्वरित शिल्लक उसाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा युवक राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर ऋषिकेश गुरव, रोहित देशमुख,रणजित पाटील,प्रशांत गवळी,सूरज यादव,नितीन पुंड,समाधान भोसले,अजिनाथ जावीर आदी च्या सह्या आहेत.

Related Stories

महानगरपालिकेमार्फत माझी कृष्णामाई स्वच्छता अभियानाची तयारी पूर्ण – उपायुक्त

Abhijeet Khandekar

सांगली : दिघंचीतील महिला डॉक्टरला कोरोनाची लागण

Archana Banage

जिल्हय़ात 12 कोरोनाबाधित वाढले

Archana Banage

कुपवाड गावभागात घरफोडी, ३९ हजाराच्या दागिन्यांची चोरी

Archana Banage

सांगली : नवकृष्णा व्हॅली शाळेसमोर तब्बल १० मोठ्या झाडांची कत्तल

Archana Banage

कडेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने ऊस भुईसपाट

Archana Banage