तरूण भारत प्रतिनिधी
ऊसाचा रस ( Sugarcane juice ) सर्वात लोकप्रीय पेयांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा रस फक्त गोड आहे म्हणूनच नाही तर पिण्यास अत्यंत शितल आणि आल्हाददायी असणाऱ्या या पेयाचे खुपच आरोग्यवर्धक फायदे असल्या कारणाने रासायनिक शितपेयाच्या बाजारात सुद्धा लोकप्रिय आहे. हे एक नैसर्गिक आणि सेंद्रिय पेय असल्याने काही अपवाद वगळता याचे भरपूर फायदे आपल्या शरिराला मिळतात.
साधारणत: ऊस हा १० व्या महिन्यानंतर खाण्यास योग्य होतो. तर १० ते १५ महीन्यापर्यंत तो खाण्यास आरोग्याला सकस ठरतो. ऊसाचा बुडका किंवा सर्वात खालील भाग हा अत्यंत खुप गोडसर असतो. ऊस चावुन खाल्ल्याने ऊस हा कफवर्धक, बलवर्धक व वात व पित्तदोष दूर करतो. ऊसाच्या रसातील पोटॅशिअममुळे (potassium) मुळे पचन शक्ती सुधारते. यामुळे शरिरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जाऊन एक नैसर्गिक विषनाशक म्हणून काम करते.
डिसेंबर ते फेबृवारी या हिवाळ्याच्या कालखंडात हे पिक येत असल्याने ऊसाचा रस अत्यंत लाभदायी ठरतो. ग्लूकोज आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स यामुळे उसाचा रस एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनते. यामुळे उन्हाळ्यात ऊर्जेशिवाय शरीराला शांत आणि थंड ठेवण्यास देखील मदत मिळते. ऊसाचा रस हा डिहायड्रेशन कमी करून आपल्या शरिरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखतो.
या रसाच्या सेवनाने त्वचा तजेलदार आणि चमकदार राहते. निरोगी राहते. त्यातील अल्फा हाइड्रोक्सी एसिड आणि ग्लायकोलिक ऍसिडमुळे ऊस त्वचेसाठी एक वरदान ठरते. यामुळे चेहऱ्यावरिल पुरळ दूर होतात त्याशिवाय चेहर्यावरचे डागसुध्दा नष्ट होतात. ऊसरसाच्या कायम सेवनाने स्किन हायड्रेटेड राहते त्यामुळे आपण वयापेक्षा खुपच तरूण दिसतो.
शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी ऊसाचा रस अत्यंतिक महत्वाचा ठरतो. ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहणे हे मधुमेही रुग्णासाठी खुपच फायदेशीर ठरते. ऊसाच्या रस हा फायबरने समृद्ध असल्याने पोट दीर्घकाळ भरून ठेऊन वजन कमी करण्यास मदत करते. हृदयविकारावर ऊसाचा रस अत्यंत ऊपयुक्त ठरतो.
ऊसाचा रस हा मधूर, थंड आणि, स्निग्ध असल्याने विर्यवृद्धीसाठी अत्यंत गुणकारी ठरते.
किडनीचे काम उत्तमरीत्या आणि सुरळीत राहण्यासाठी प्रोटिनची आवश्यकता असते. उसाचा रस प्रोटिनने भरपूर असल्यामुळे आपले मुत्रनिस्सारणाची कार्ये सुरळीत पार पडतात. उसाचा रस हा एक एंटीबायोटिक एजेंट असून एवढंच नव्हे तर युरीनमध्ये होणारी जळजळ देखील कमी करतो.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी योग्य प्रमाणात उसाचा रस खाणे हे फायदेशीर ठरू शकते कारण यात ग्लूकोज जरी असला तरी काही प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्ससुद्धा असतो.
उसाचा रस एंटीऑक्सीडेंटने भरपूर असल्याने शरीरामध्ये वाढणाऱ्या विघातक शक्तिंविरूद्ध लढण्यास मदत करतो रसामध्ये असणाऱ्या फ्लेवोन (flavones) हा घटक कँसरच्या कोशिकांनाचा प्रसार थोपवतो.
ऊस चाऊन खाल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते तसेच मिनरल्स, पोटॅशियम आणि अल्केलाइन असल्यामुळे उसाच्या रस एंटीबॅक्टीरियल म्हणून काम करतो यामुळे दातांना इन्फेक्शनपासून बचाव आणि ते निरोगी राहण्यास मदत मिळते.
मात्र रस बनवण्याचे यंत्र स्वच्छ नसल्यास Leptospirosis या व्याधीचे संक्रमण होते.