Tarun Bharat

ऊस वाहतूक ठरतेय जीवघेणी

क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून वाहतूक, वारंवार अपघात, शिस्त लावण्याची गरज

प्रतिनिधी/ बेळगाव

शहराबाहेरील मार्गांवर धोकादायक ऊस वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नियमांची पायमल्ली करून क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे टॅक्टर, ट्रक कलंडण्याच्या घटना घडत आहेत. प्रवास करताना इतर वाहनधारकांनाही जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन समज द्यावी, अशी मागणी होत आहे.

साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विविध भागात ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे. तोडणी झालेला ऊस टॅक्टर आणि ट्रकमधून कारखान्याकडे नेला जात आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ऊस भरल्यामुळे रस्त्यावरील अन्य वाहनांना याचा त्रास होत आहे. विशेषतः बेळगाव-वेंगुर्ला, बेळगाव-हंदिगनूर, बेळगाव-राकसकोप आदी मार्गांवर ही वाहतूक सुरू आहे. ट्रक कलंडणे अथवा अपघात घडून जीव गमवावा लागणे यासारख्या घटना घडूनदेखील  दरवषी उसाची धोकादायक वाहतूक सुरूच असते.

ट्रॉलीच्या पाठीमागे रिफ्लेक्टर बसविण्याकडे दुर्लक्ष

वर्दळीच्या रस्त्यावर सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत ही वाहतूक अधिक प्रमाणात होते. दरम्यान शाळकरी मुले, शेतकरी आणि कामगारवर्गांसाठी ही वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. शिवाय वाहन चालकांकडून ट्रॉलीच्या पाठीमागे रिफ्लेक्टर बसविण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात अपघाताची शक्मयता असते. तर काही ऊस वाहतूक चालक भररस्त्यातच वाहने थांबवितात. त्यामुळे पाठीमागून येणाऱया वाहनांसाठी मोठा अडथळा निर्माण होतो. तर गावाजवळ उसाची ट्रॉली आल्यास लहान मुले ऊस खाण्यासाठी ट्रॉलीवर लेंबकळत असतात. त्यामुळे मुलांच्या जीवालादेखील धोका निर्माण झाला आहे. अशा ऊस वाहतूक करणाऱया ट्रक आणि ट्रक्टर चालकांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

हुबळी अकादमी ब, एसएजी, बीडीके हुबळी क संघांचे सहज विजय

Amit Kulkarni

निपाणीत प्लास्टिक बंदीची धडक कारवाई

Patil_p

वर्दळीमुळे रामघाट रस्ता बनला जीवघेणा

Amit Kulkarni

मुचंडी गणेश मंदिर कळसारोहण सोहळ्याला प्रारंभ

Amit Kulkarni

बुधवारी जिल्हय़ात आढळले 956 कोरोनाबाधित रुग्ण

Amit Kulkarni

लम्पिस्कीन रोगाने आणखी एक बैल मृत्युमुखी

Amit Kulkarni