Tarun Bharat

सुहास कांदेंच्या आरोपानंतर शंभूराजे देसाई आणि सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

Maharashtra Political : एकनाथ शिंदेंना सुरक्षा न देण्याबाबत वर्षावरून शंभूराजे देसाई यांना फोन आला होता असा गंभीर आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला. त्यांच्या या आरोपावरून राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान शंभूराजे देसाई आणि सतेज पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. सुहास कांदेंच्या आरोपाला देसाई यांनी दुजोरा दिला आहे.

काय म्हणाले शंभूराजे देसाई

एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालक मंत्री असताना नक्षलवाद्यांनी एक पत्र पाठवले होते. या पत्रात बदला घेतला जाईल. त्यांच्यासह त्यांच्याकुटुंबाला संपवणार असल्याची धमकी देण्यात आली होती. हे पत्र विधानपरिषदेत गृहखात्याकडे देण्यातं आलं होतं. याविषयी सखोल चर्चा ही करण्यात आली होती. त्या पत्राचे तथ्थ बाहेर काढू आणि गरज पडली तर कुटुंबासह त्यांना विशेष सुरक्षा वाढवली जाईल असे सांगण्यात आले होते. जेव्हा या पत्रातील सत्यता पडताळली गेली तेव्हा तथ्थ समोर आलं. त्यानंतर तातडीने राज्याचे पोलिस महासंचालक, लाॅर्ड अधिकारी, एसआयडी कमिशनर, गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी यांची बैठक मुंबईत बोलवण्यात आली होती. याच दरम्यान आढावा घेत असताना सव्वा आठच्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. शिंदेंना सुरक्षा देण्याची गरज नाही असं त्यांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती दिली.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं ; सुहास कांदेंचा गंभीर आरोप


सतेज पाटील काय म्हणाले

कोल्हापुरात आज सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत कांदेंनी केलेल्या आपोपाला खोडून काढले. सतेज पाटील म्हणाले, कोणतीही सुरक्षा देत असताना त्याचे काही नियम असतात. त्यावर वेगळी कमिटी असते. त्याची सर्व जबाबदारी चिफ सेक्रटरी अंडर कमिटी असते त्यांच्यावर असते. यासाठी थ्रेट अॅनॅलिसिस असतो. जेव्हा एसआयडीचा रिपोर्ट येतो तेव्हा परीक्षण केलं जातं. त्यानंतर ज्यांना सुरक्षा देण्याची गरज असते त्यांनी दिली जाते. यात मुख्यमंत्री, गृहमंत्री हस्तक्षेप करत नाहीत अस स्पष्ट केलं

Related Stories

महाविकासने कौर्याच्या सीमा ओलांडल्या; राणांच्या भेटीनंतर फडणवीसांचा हल्लाबोल

Rahul Gadkar

बेकायदा पिस्टलसह कराड तालुक्यातील दोघे जेरबंद

Patil_p

कोल्हापूर : हुपरीच्या चांदी उद्योजकाची स्‍वत: वर गोळी झाडून आत्‍महत्‍या

Abhijeet Shinde

Kas Pathar : कास पठारावरील फुलांचा हंगाम १0 सप्टेंबर पासून सुरू

Archana Banage

सातारा : मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पेठ वडगावात सोमवारपासून दहा दिवसाचा जनता कर्फ्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!