Tarun Bharat

आचरा देऊळवाडी येथील विवाहित महिलेची आत्महत्या

Advertisements

आचरा /प्रतिनिधी-

आचरा देऊळवाडी येथील राखी प्रसाद घाडी (33) या विवाहित महिलेने राहत्या घराच्या मागील पडवीत  नायलॉन दोरीच्या साहाय्याने  गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार सकाळी 8.30 च्या  दरम्यान घडली. या घटनेची खबर आचरा पोलिसांना तिचे पती प्रसाद घाडी यांनी दिली.


आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राखी घाडी हिने आत्महत्या केल्याची   फिर्याद त्याचे पती प्रसाद घाडी  यांनी दिली. फिर्यादीत त्यांनी आपण सकाळी कामावर गेल्यानंतर आपली पत्नी एकटीच मुलासमवेत घरी होती. मी कामावर असताना वाडीतील शेजाऱ्यांनी माझ्या घराचा दरवाजा बंद असून मुलगा बाहेर रडत असल्याचे कळविले. मी कामावरून  घरी आलो असता घराला आतून कडी लावलेली होती. पडावीत मागच्या बाजूने छपरावर चढून आत प्रवेश केला असता माझी पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याचे त्यांनी फिर्यादीत सांगितले.
घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील हजर झाले होते. सदर घटनेचा तपास  आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल एस एस कांबळे करत आहेत. राखी यांच्या पश्चात  पती , मुलगा, सासू असा परिवार आहे.

Related Stories

दापोलीकर गारठले, तापमान 10 अंश सेल्सिअस

Abhijeet Shinde

पुस्तके घरपोच करण्यास शिक्षक समितीचा विरोध

NIKHIL_N

महिला फुटबॉल हबसाठी अंजूचे महत्वाकांक्षी पाऊल

Sumit Tambekar

रत्नागिरी (दापोली) : मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी शहर भाजपचे अनोखे आंदोलन

Abhijeet Shinde

शरद पवारांची दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद ; मोदी भेटीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Abhijeet Shinde

‘कोरोना’ला नक्कीच हरवू

NIKHIL_N
error: Content is protected !!