Tarun Bharat

वाढदिनीच पोलिसाची आत्महत्या

Advertisements

फलटण शहर पोलीस स्टेशनला होते कार्यरत, पोलीस दलात खळबळ

प्रतिनिधी/ फलटण

फलटण शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱया पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या वाढदिनादिवशीच पोलीस कॉलनीतील आपल्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ माजली आहे. अच्युत साहेबराव जगताप (वय 31 रा. एनकुळ ता. खटाव) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱयाचे नांव आहे. 

फलटण शहर पोलीस ठाण्यात गेली पाच वर्षापासुन पोलीस हवालदार म्हणुन पोलीस प्रशासनात कार्यरत होते. दि.2 ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. सांयकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोलीस वसाहतीमधील आपल्या राहत्या घरात जगताप यांनी आत्महत्या केली. मात्र आत्महत्येचे कारण अद्यापही समजले नाही. अधिक तपास फलटण शहर पोलीस करीत आहेत.

Related Stories

सीपीआरमध्ये कोरोना कक्षात मृत्यू झालेल्या सांगरुळच्या वृद्धाचा अहवाल निगेटिव्ह

Archana Banage

विना परवाना भाजी विक्री करणायांवर सातारा पालिकेचा कारवाईचा बडगा

Patil_p

गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ पुन्हा हजर

Patil_p

काशीळमध्ये एकाची आत्महत्या

datta jadhav

शाहूपुरीतील पाणी गळतीने हजारो लिटर पाणी वाया

Patil_p

फिटनेस दाखल्यासाठी पोलिसाची अडवणूक

Patil_p
error: Content is protected !!