जैसलमेर पोलिसांकडून तपास सुरू
वृत्तसंस्था/ जैसलमेर
राजस्थानच्या जैसलमेरला लागून असलेल्या पाकिस्तान सीमेवर तैनात बीएसएफच्या एका जवानाने आत्महत्या केली आहे. या जवानाने स्वत:च्या सर्व्हिस रायफलद्वारे गोळी झाडून घेत स्वत:चे आयुष्य संपविले आहे. सहकारी जवानांनी या घटनेची माहिती त्वरित अधिकाऱ्यांना दिली आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने तनोट पोलिसांना पाचारण केले. पोलीस आता या जवानाच्या आत्महत्येच्या कारणांसंबंधी तपास करत आहेत.
बीएसएफच्या 92 बीएन बटालियनमध्ये तैनात जवान मोहिन मोला (36 वर्षे) हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. मोहिन मोला यांच्या आत्महत्येची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. कुटुंबीय जैसलमेर येथे पोहोचल्यावर उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. मृत जवानाकडून कुठलीच सुसाइड नोट सापडलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.