Tarun Bharat

कण्हेर धरणात युवक-युवतीची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, मृत सातारा शहरातील

प्रतिनिधी / सातारा

सातारा शहरातून बेपत्ता झालेल्या युवक-युवतीचे मृतदेह कण्हेर धरणात शुक्रवारी आढळून आल्यानंतर एकच खळबळ झाली आहे. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केली असल्याचे मानण्यात येत असून त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून सातारा पोलीस रात्री उशिरापर्यंत याबाबत तपास करत होते. अरबाज इब्राहिम देवाणी (वय 24 रा. बुधवार पेठ, सातारा) व ज्योत्स्ना कुमार लोखंडे (वय 24 रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे या युवक-युवतीचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ज्योत्स्ना कुमार लोखंडे आणि अरबाज इब्राहिम देवानी हे दोघेही गुरुवार दि. 8 रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून सातारा येथून बेपत्ता झाले होते. दोघांचेही नातेवाईक आणि मित्रपरिवार त्यांचा शोध घेत असताना कण्हेर धरण परिसरात ज्योत्स्ना कुमार लोखंडे या मुलीची स्कुटी व अरबाज इब्राहिम देवानी या मुलाचा मोबाईल, गॉगल धरणपात्रालगत आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपाधीक्षक मोहन शिंदे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घोडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. कण्हेर धरण परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती.

संबंधितांचा शोध घेत असताना शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास ज्योत्स्ना कुमार लोखंडे या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. मात्र मुलाचा मृतदेह आढळला नसल्याने तपास सुरू ठेवला. दुपारी 4 च्या सुमारास अरबाज इब्राहिम देवानी याचा मृतदेह धरणात सापडल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. दोन्ही मृतदेहाबाबत उलटसुलट चर्चा असून रात्री उशिरापर्यंत याबाबत माहिती मिळू शकली नाही. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू अशी झाली आहे.

Related Stories

परळी खोऱ्यात लम्पीचा शिरकाव

Archana Banage

शरद पवारांच्या घरावरील दगडफेकीचा राष्ट्रवादीकडून निषेध

Abhijeet Khandekar

उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट ; म्हणाले…

Archana Banage

मोलकरणीने लाखाचे दागिने चोरल्याची तक्रार

Patil_p

दिव्यांग असुनही तो करतोय कोरोनाबाबत जनजागृती

Archana Banage

सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून विकासाचे चक्र सुरु: पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Archana Banage