वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लिमामध्ये सुरू असलेल्या पेरु पॅरा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तृतीय मानांकित बॅडमिंटनपटू सुकांत कदमने एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. आता सुकांत कदमचा उपांत्यफेरीचा सामना ग्वाटेमालाच्या रॉवेल अँग्युनियोशी होणार आहे.
या स्पर्धेत सुकांत कदमने आपल्या गटातील प्राथमिक सामन्यात फ्रान्सच्या सॅरोवर्ड, चीनच्या अँक्वेसी यांना सरळ गेम्समध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले होते. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सुकांत कदमने ब्राझीलच्या ब्रेनो जोहाननचा 21-14, 21-9 असा फडशा पाडत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. सुकांत कदमचा उपांत्यफेरीचा सामना रविवारी होणार आहे.