2015 कोटकपुरा गोळीबार प्रकरण
वृत्तसंस्था/ चंदीगड
शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल हे 2015 मध्ये झालेल्या कोटकपुरा गोळीबार प्रकरणाची चौकशी करणाऱया पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर बुधवारी उपस्थित राहिले. अतिरिक्त पोलीस महासंचालक एल.के. यादव यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने बादल यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. कोटकपुरा गोळीबाराच्या घटनेवेळी बादल हे राज्याचे उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्री होते. यापूर्वी एसआयटीने 30 ऑगस्ट रोजी बादल यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु बादल उपस्थित राहिले नव्हते. 2015 मधील बहबल कलां येथील पोलीस गोळीबाराच्या घटनेची चौकशी करणाऱया एका अन्य एसआयटीने 6 सप्टेंबर रोजी बादल यांची चौकशी केली होती.