Tarun Bharat

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Lavani Singer Sulochana Chavan passed away मागील साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. वयोपरत्वे आलेले आजारपण आणि काही शस्त्रक्रियांमुळे मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज दुपारी 12 च्या सुमारास  मुंबईतील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, सोळावं वरीस धोक्मयाचं, पावणा पुण्याचा आलाय गं अशा शेकडो ठसकेबाज लावण्या गात सुलोचना चव्हाण यांनी श्रोत्यांना भुरळ घातली. त्यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे.

अधिक वाचा : 12 कोटींच्या फ्लॅटसाठी मुंबईत अभिनेत्रीची हत्या; मृतदेह फेकला माथेरानच्या जंगलात

सुलोचना चव्हाण काही महिन्यांपूर्वी घरात पडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या कमरेचं हाड मोडलं होतं. शस्त्रक्रियेला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. तेव्हापासून त्या एकाच जागेवर होत्या. तसेच वयोपरत्वे आलेले आजरपण यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. गिरगावमधील फणसवाडी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Related Stories

अमेरिकेच्या टेक्सास, फ्लोरिडात पुन्हा निर्बंध

datta jadhav

चीनहून आयात केलेल्या रॅपिड टेस्टिंग किटमध्ये तब्बल 145 टक्के नफेखोरी

prashant_c

अनंतनागमध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

जातीनिहाय जनगणनेसाठी रासपही आक्रमक

datta jadhav

कोल्हापूरच्या माहेश्वरी यांनी ऑस्ट्रेलियात फडकवला तिरंगा

Archana Banage

महाविकास आघाडी सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपरमंत्री – देवेंद्र फडणवीस

Archana Banage