Tarun Bharat

सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धा नोव्हेंबरमध्ये

Advertisements

वृत्तसंस्था/ इपोह, मलेशिया

मलेशियातील प्रमुख हॉकी स्पर्धा असलेल्या सुलतान अझलन शहा स्पर्धेचे दोन वर्षांच्या खंडानंतर पुनरागमन होत आहे. कोरोना महामारीच्या कारणास्तव मागील दोन वर्षे ही स्पर्धा घेण्यात आली नव्हती. नोव्हेंबरमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा 16 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 25 नोव्हेंबर रोजी त्याची अंतिम लढत होणार आहे. जागतिक अग्रमानांकित ऑस्ट्रेलिया, पाचवे मानांकित जर्मनी, भारत, न्यूझीलंड, कॅनडा यांना या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरुवात 1983 मध्ये झाली असली तरी सुलतान अझलन शहा स्पर्धा ही 1998 पासून एफआयएच कॅलेंडरमधील नियमितपणे घेतली जाणारी स्पर्धा आहे. हॉकीचे परमचाहते व एफआयएच कार्यकारी मंडळाचे माजी सदस्य एचआरएच सुलतान अझलन शहा यांच्या नावे ही स्पर्धा घेतली जाते. 2019 मध्ये याआधी शेवटची स्पर्धा झाली होती आणि त्यात दक्षिण कोरियाने अंतिम फेरीत भारताला हरवून जेतेपद पटकावले होते. द.कोरियाने त्यावेळी तिसऱयांदा ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी भारताचा सुरेंदर कुमार स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. ऑस्ट्रेलिया हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी दहावेळा ही स्पर्धा जिंकली आहे तर भारताने ही स्पर्धा पाचवेळा जिंकली आहे. याशिवाय पाकिस्तान व द.कोरिया यांनी प्रत्येकी 3 वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. 

Related Stories

भारताविरुद्ध जपानचा 10 गडय़ांनी फडशा

Patil_p

भारताचे तीन पात्रता फुटबॉल सामने कतारमध्ये

Patil_p

रशियाचे आईस हॉकी ज्युनियर वर्ल्ड कपचे यजमानपद रद्द

Patil_p

सचिनची कोरोनावर मात

Patil_p

ग्रॅहम थॉर्प अफगाण संघाचे प्रमुख प्रशिक्षक

Patil_p

दोन गोलांच्या पिछाडीनंतर नॉर्थईस्टने ब्लास्टर्सला बरोबरीत रोखले

Patil_p
error: Content is protected !!