Tarun Bharat

सुमित शिरगुरकरची ‘गदायुद्ध’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावची तरुणाई सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. येथील अनेक तरुण चित्रपट, नाटय़क्षेत्रात विविध जबाबदाऱया सांभाळत आहेत. आता विशेष लक्षणीय बाब म्हणजे बेळगावचा तरुण पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱया चित्रपटाचा हिरो म्हणून पुढे येत आहे.

सुमित शिरगुरकर असे त्याचे नाव असून ‘गदायुद्ध’ या चित्रपटामध्ये त्याची प्रमुख भूमिका आहे. त्याचा टिझर सध्या रिलीज झाला असून तरुणाईचा त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मुख्य म्हणजे प्रमुख हिरोच्या भूमिकेत दिसणाऱया सुमितने आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयाची उत्कृष्ट छाप उमटवली आहे.

सुमितला अभिनयाची आवड आहे. या चित्रपटासाठी त्याने बरीच मेहनत केल्याचे टिझरवरून जाणवते. त्याचे वडील नामवंत बांधकाम व्यावसायिक नितीन शिरगुरकर यांना चित्रपट पाहण्याबरोबरच त्याचा अभ्यास करण्याची आवड आहे. त्यामुळे या चित्रपटाची निर्मिती नितीन यांचीच असून त्यांच्या ‘एनएसएफ’ प्रॉडक्शनच्या माध्यमातून ‘गदायुद्ध’ लवकरच प्रदर्शित होत आहे.

मुख्य म्हणजे हा चित्रपट एकाचवेळी पाच भाषांतून प्रदर्शित होणार आहे. चित्रपट अधिक प्रभावी होण्यासाठी भारतातील प्रसिद्ध अशा प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी त्याचे चित्रिकरण झाले आहे. असुरी आणि अघोरी विद्येचा प्रयोग करून समाजात आजही सामान्यजनांना त्रास दिला जातो. अशा असुरी शक्तींचा बिमोड करण्यासाठी गदेचा प्रहारच कसा प्रभावी ठरतो, हे सांगणारा हा चित्रपट आहे.

सुमित आणि या चित्रपटातील नायिका लवकरच बेळगावमध्ये येऊन संवाद साधणार आहेत. पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱया चित्रपटाचा हिरो बेळगावचा सुपुत्र असावा, ही बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

Related Stories

मि.रॉ क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा 2 एप्रिल रोजी

Amit Kulkarni

शेवटच्या दिवशी 13 जणांचे अर्ज दाखल

Amit Kulkarni

बेळगावला रेमडेसिवीरचा पुरवठा सुरू

Amit Kulkarni

रखडलेल्या योजनांसाठी बुडाकडून नोटिसा

Amit Kulkarni

अन्‌ कोयत्याने घेतला पाय कापून

Nilkanth Sonar

महसूल कर्मचाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!