Tarun Bharat

सुमित्रा महाजन यांची एसकेई सोसायटीला भेट

प्रतिनिधी / बेळगाव

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी एसकेई सोसायटीला सदिच्छा भेट दिली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू, सचिव अॅड. राज देशपांडे, सुधीर शानभाग आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. संस्थेतर्फे किरण ठाकुर यांच्या हस्ते सुमित्रा महाजन यांचा सत्कार करण्यात आला. त्या म्हणाल्या, प्रत्येकाने राष्ट्राच्या प्रगतीच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे तेच आपले हित समजून प्रयत्न करावा. आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. परंतु मोबाईलवरच अवलंबून न राहता त्याचा सदुपयोग करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. किरण ठाकुर यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांनी आभार मानले.

Related Stories

वीज असूनही ‘सोलार’वर कोटय़वधीचा खर्च

Amit Kulkarni

अलतगा माळीभरम मंदिराचा लोकार्पण सोहळा

Amit Kulkarni

हिरेबागेवाडीहून मुतग्याला आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

रिंगरोडविरोधात 823 हरकतींची नोंद

Amit Kulkarni

‘लोकमान्य’ देशात अव्वलस्थानी नेणार!

Amit Kulkarni

कष्टाच्या भाकरीतून देशासाठी खारीचा वाटा

Patil_p