बटाटा लागवडीत घट, योग्य भाव आणि कमी खर्चिक रताळय़ाकडे वाढता कल
प्रतिनिधी /बेळगाव
योग्य भाव आणि कमी खर्चामुळे रताळी वेल लागवडीकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा रताळी उत्पादनात उच्चांकी वाढ झाली आहे. त्याबरोबर आता उन्हाळी रताळी लागवडीत देखील वाढ होणार आहे. यापूर्वी रताळी केवळ पावसाळय़ात लावली जात होती. मात्र आता उन्हाळय़ातही लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.
अलीकडच्या काही वर्षात बटाटा लागवडीत घट झाली असून त्या ठिकाणी रताळी वेल लागवड केली जात आहे. त्यामुळे यंदा बटाटा उत्पादनात घट झाली आहे. मात्र रताळी उत्पादन उच्चांकी वाढले आहे. लाल जमिनीत व माळरानावर रताळी वेल लागवड केली जाते. मात्र अलीकडे काळय़ा जमिनीत देखील रताळय़ाची लागवड होत आहे. योग्य भाव आणि उत्पादनासाठी कमी खर्च येत असल्याने शेतकरी रताळी लागवडीला पसंती देत आहेत.
गरिबांचे पीक म्हणून रताळय़ाकडे पाहिले जाते. या पिकाला कोणताही बियाणांचा खर्च नसल्याने लागवड खर्च कमी येतो. केवळ वेल लागवड केल्यानंतर त्याला रताळय़ाचे उत्पादन सुरू होते. त्यामुळे कमी खर्चिक असलेल्या या पिकाकडे शेतकरी आता वळू लागले आहेत. तालुक्मयात सर्वत्रच आता रताळी लागवड आणि उत्पादन देखील होवू लागले आहे.
एपीएमसी बाजारात रताळय़ाला 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दर आहे. शिवाय मागील दोन वर्षांपासून योग्य आणि समाधानकारक भाव मिळत असल्याने रताळी पिकाकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे.
बटाटा पीक खराब होवून उत्पादनात मोठी घट झाली आहे. शिवाय बटाटय़ाला योग्य भाव देखील मिळत नसल्याने बटाटा लागवडीकडे कल कमी झाला आहे. त्या ठिकाणी रताळी लागवड केली जात आहे. तसेच ऊस लागवडीकडे देखील शेतकऱयांचा कल वाढत आहे.
यंदा उन्हाळी रताळी लागवडीकडे देखील शेतकऱयांचा कल वाढला आहे. रताळय़ाला दर टिकून असल्याने आणि खर्च कमी असल्याने बटाटा लागवडीच्या ठिकाणी रताळी लागवड होणार आहे. केवळ पावसाळय़ात घेणारे हे पीक आता उन्हाळय़ात देखील शेतकरी घेवू लागले आहेत. पावसाळी बटाटा, रताळी, भुईमूग आणि सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आहे. त्याबरोबर भातकापणी देखील सुरू आहे. तसेच रताळी लागवडीसाठी जमिनीची मशागत देखील सुरू झाली आहे.
आता सर्वत्र रताळी वेल लागवड
रताळी उत्पादन वाढले आहे. शेतकऱयांचा कल रताळी लागवडीकडे वाढला आहे. भाव टिकून राहत असल्याने आणि खर्च कमी येत असल्याने रताळी लागवडीकडे शेतकरी वळला आहे. पूर्वी केवळ लाल जमिनीत ही लागवड होत होती. मात्र आता सर्वत्र रताळी वेल लागवड वाढली आहे.
– आर. बी. नायकर (तालुका साहाय्यक कृषी अधिकारी)