मुंबई
अमेरिकेतील खाद्य व औषध प्रशासनाने कंपनीला पुरवठा थांबवण्यास सांगितल्याचा परिणाम सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रिजच्या समभागावर सोमवारी दिसून आला. कंपनीचा समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 3 टक्के घसरत 960 रुपयांवर खाली आला होता. कंपनीच्या मोहाली येथील निर्मिती प्रकल्पाला अमेरिकेतील प्रशासनाने पत्र पाठवले आहे. औषधांचे अंतिम उत्पादन पाठवताना काळजीपूर्वक, तपासून पाठवण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे समजते. कंपनी याबाबत दखल घेत असून प्राथमिक पातळीवर पुरवठा थांबवल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.