पहिल्या क्रमांकाची कुस्ती कार्तिक काटे विरुद्ध निर्मल सिंग
वार्ताहर /किणये
कलमेश्वर फार्मर्स सोसायटी बीजगर्णी यांच्यावतीने खास महाशिवरात्रीनिमित्त रविवार दि. 19 रोजी दुपारी 3 वाजता बीजगर्णी येथील ब्रह्मलिंग मंदिराजवळ भव्य कुस्ती आखाडय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्तीगीर संघटनेच्यावतीने या आखाडय़ाची जय्यत तयारी करण्यात आली असून आखाडय़ात पहिल्या क्रमांकाची कुस्ती दावणगिरी येथील डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध दिल्ली येथील निर्मल सिंग यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन दर्गा तालीम येथील शिवा दड्डी विरुद्ध मध्य प्रदेश येथील प्रदीप ठाकूर यांच्यात होणार आहे. तिसऱया क्रमांकाची कुस्ती राशिवडे येथील सौरभ पाटील विरुद्ध महेश लंगोटी यांच्यात होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती कारवे येथील कीर्ती कुमार विरुद्ध विक्रम शिनोळी यांच्यात होणार आहे. पाचव्या क्रमाकाची कुस्ती कोल्हापूर येथील अवधूत चिंचल विरुद्ध पैलवान रोहित कंग्राळी यांच्यात होईल. सहाव्या क्रमांकाची कुस्ती सुनील बेडगिरी विरुद्ध संभाजी परमोजी यांच्यात होणार आहे. सातव्या क्रमांकाची कुस्ती राजू शिनोळी विरुद्ध ओमकार मुतगा यांच्यात होणार आहे. या आखाडय़ात एकूण 40 नामवंत पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोनापा भास्कळ राहणार आहेत. हौशी कुस्ती प्रेमींनी या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.