Tarun Bharat

भारतीय फुटबॉल संघात सुनील चेत्रीचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू 37 वर्षीय सुनील चेत्रीचे आगामी होणाऱया जॉर्डनविरुद्धच्या मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यासाठी राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. 28 मे रोजी हा मित्रत्वाचा सामना डोहा येथे खेळविला जाणार आहे.

वारंवार दुखापतीमुळे चेत्रीला गेल्या ऑक्टोबर महिन्यानंतर फुटबॉल क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. छेत्रीsने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेतील नेपाळविरुद्ध खेळला होता. जॉर्डनविरुद्ध होणाऱया या सामन्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने 25 जणांचा संघ जाहीर केला आहे. भारतीय फुटबॉल संघ- गोलरक्षक- गुरप्रितसिंग संधू, लक्ष्मीकांत कट्टीमनी, अमरिंदरसिंग, बचावफळी- राहुल भेके, आकाश मिश्रा, हरमनज्योत सिंग खाब्रा, रोशनसिंग, अन्वरअली, संदेश झिंगन, एस. बोस, प्रितम कोटल, मध्यफळी- जीक्सन सिंग, अनिरुद्ध थापा, ग्लॅन मार्टिन्स, ब्रेन्डॉन फर्नांडिस, रित्विक दास, उदांता सिंग, यासीर महमद, साहिल अब्दुल समद, सुरेश वांगजम, आशिक कुरुनियन, लिस्टन कुलासो, आघाडीफळी- इशान पंडिता, सुनील चेत्री आणि मानवीर सिंग

Related Stories

जी. साथियानचा जॉर्गिक डार्कोला धक्का

Patil_p

टेबल टेनिस फेडरेशनची बैठक शनिवारी

Amit Kulkarni

स्विटोलिना, सेरेना, केनिन, व्हेरेव्ह तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

विराट कोहलीच्या 7000 धावा

Patil_p

लवलिना, निखत झरीन, मंजू राणी उपांत्य फेरीत

Patil_p

सेरेना, मेदवेदेव्ह, मरे, गार्सिया यांची विजयी सलामी

Patil_p