Tarun Bharat

नामुष्की टाळण्यासाठी गावस्करांचा मोठा निर्णय, 33 वर्षांनी…

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :  

टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी म्हाडाकडून (MHADA) वांद्रे पूर्व येथील मोक्याची जागा देण्यात आली होती. ही जागा गावस्कर यांनी 33 वर्षानंतर म्हाडाला परत केली आहे. 

सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला 1880 च्या दशकात क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी म्हाडाने मुंबईतील वांद्रे पूर्व येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला 21,348 चौरस फुटांचा हा भूखंड दिला होता. मात्र, त्या ठिकाणी अकादमी बांधू न शकल्यानं गावस्कर यांनी ही जमीन म्हाडाला परत केली आहे. 

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर या विषयावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आव्हाड यांच्या नाराजीनंतर सरकार ही जमीन गावस्करकांच्या ताब्यातून घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी गावस्कर यांनी ही जमीन म्हाडाला परत केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना पत्र लिहिलं आहे. सध्या मी करत असलेल्या कामाचा विचार करता मला त्या जागेवर अकादमी सुरू करणे शक्य होणार नाही. म्हाडाला या जागेचा विकास करायचा असेल, तर मला आनंदच आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

Related Stories

हिमस्खलनानंतर 5 नौसैनिक बेपत्ता

Patil_p

नोटाबंदीच्या निर्णयाची होणार चौकशी

datta jadhav

गाझीपूर फुल मार्केटमध्ये सापडली स्फोटकांनी भरलेली बॅग

datta jadhav

…म्हणून सचिन वाझेने अंबानींच्या घरासमोर ठेवली स्फोटकांची गाडी

Archana Banage

चेन्नईतच खेळेन शेवटचा टी-20 सामना – धोनी

Patil_p

भारताचा द.आफ्रिकेवर एकतर्फी मालिकाविजय

Patil_p
error: Content is protected !!