वृत्तसंस्था/ नवी मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे डी.वाय.पाटील स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याला दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होईल. हैदराबाद संघाने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने जिंकले असून आता त्यांचे लक्ष चौथ्या विजयावर आहे.
या स्पर्धेच्या प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी हैदराबाद आणि पंजाब या दोन संघामध्ये चुरस निर्माण झाली आहे. हैदराबाद आणि पंजाब यांनी आतापर्यंत प्रत्येकी समान 6 गुण मिळविले आहेत. हैदराबाद संघाने सलामीच्या पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करल्यानंतर त्यांनी सलग तीन सामने जिंकून मुसंडी मारली आहे. हैदराबाद संघाने चेन्नई, गुजरात आणि कोलकाता या संघांचा पराभव केला आहे. न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनकडे हैदराबाद संघाचे नेतृत्व असून मयांक अगरवाल पंजाबचा कर्णधार आहे. पंजाब संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केल्याने या संघाचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.
हैदराबाद संघाची फलंदाजी भक्कम असून कर्णधार विल्यम्सन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, दक्षिण आफ्रिकेचा मॅरक्रम व विंडीजचा पुरन यांची फलंदाजी बहरत आहे. वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस गोपाल, भुवनेश्वरकुमार, जान्सेन हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. पंजाब संघाच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने अगरवाल, शिखर धवन, बेअरस्टो यांच्यावर आहे. लिव्हिंगस्टोन, शाहरूख खान, ओडीयन स्मिथ यांना मधल्या फळीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
पंजाब किंग्ज इलेव्हन- मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंग, रबाडा, बेअरस्टो, राहुल चहर, ब्रार, शाहरूख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, पोरेल, लिव्हिंगस्टोन, ओडेन स्मिथ, संदीप शर्मा, राज बावा, ऋषी धवन, पी. मंकड, वैभव अरोरा, चॅटर्जी, धांडा, अनिश पटेल, इलिस, तायडे, राजपक्षे आणि हॉवेल.
सनरायजर्स हैदराबाद- विल्ययम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, मॅरक्रम, पुरन, अब्दुल समद, गर्ग, विष्णुविनोद, फिलीप्स, समर्थ, शशांक सिंग, वॉश्sिंाग्टन सुंदर, शेफर्ड, जान्सेन, सुचीत, श्रेयस गोपाल, भुवनेश्वरकुमार, ऍबॉट, त्यागी, सौरभ तिवारी, फारूकी, उमरान मलिक आणि टी. नटराजन.