Tarun Bharat

पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर

अवैध धंद्यांवर कारवाई ; 1 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी

सातारा / जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार समीर शेख यांनी काही दिवसांपूर्वी स्वाकारला आहे. त्यामुळे त्यांनी सातारा जिह्यात अवैध धंद्यांवर आळा बसवण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली असून सोमवार दि. 31 ऑक्टोबर रोजी शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असणाऱया जुगार अड्डय़ावर कारवाई केली आहे. तसेच जिह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असणाऱया दारू धंद्यांवर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून 1 लाख 61 हजार 593 रुपयांचे अवैध जुगाराचे साहित्य व रोख जप्त केली आहे.  

   सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 ठिकाणी जुगाराचा खेळ सुरू होता. या सर्व ठिकाणी पोलिसांनी सोमवारी छापा टाकला. सोमवारी शाहूपुरी पोलिसांनी एकाच दिवशी जुगाराच्या 8 अड्डय़ांवर छापा टाकला. यामध्ये शहर व शाहूपुरी असे एकूण 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुह्यांमध्ये 56 आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून 1 लाख 61 हजार 593 रूपयांचे अवैध जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे आगामी कालावधीत सुध्दा अशाच प्रकारच्या धडाकेबाज कारवाया होण्याची अपेक्षा जिल्हावासियांकडून होवू लागली आहे.

 अवैध दारूवर धंद्यावर कारवाई

जुगारासह जिह्यातील दारू धंद्यांवरही छापे टाकून कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये सातारा तालुका पोलीस ठाणे 1, औंध पोलीस ठाणे 1, वडूज पोलीस ठाणे 4, बोरगाव पोलीस ठाणे 1, असे एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या गुह्यात एकून आठ आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून एकूण 7 हजार 470 रूपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आलेला आहे. 

Related Stories

जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही : जिल्हाधिकारी

Archana Banage

रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

Sanjay Raut ED Custody : संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ई़़डी कोठडी

Abhijeet Khandekar

कृतिशील नवदुर्गा रेखा बाबासाहेब खरात

datta jadhav

खैरेंना काहीही माहित नसतं; ते ढगात गोळ्या मारतात

datta jadhav

वाढे फाटय़ावरील सहा दुकाने आगीत भस्मसात

Patil_p