नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एका कर्करोग रुग्णाचा जामीन नाकारण्यासंदर्भातील याचिकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने ईडीला दणका दिला आहे. जामीन रद्द करावा अशी मागणी ईडीने केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच न्यायालयाचा वेळ आणि साधनसामग्री वाया घालविल्यामुळे ईडीने एक लाख रुपयांचा भरणा न्यायालयात 1 महिन्यात करावा, असा निर्णय न्यायालयाने दिला.
या प्रकरणातील आरोपी एक कर्करोग रुग्ण आहे. त्याने बँकेत 24 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा ईडीचा आरोप आहे. हा गंभीर आरोप असल्याने आरोपीची सुटका जामीनावर करु नये, असा ईडीचा युक्तीवाद होता. मात्र तो अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. नंतर ईडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्णयच कायम ठेवला आहे. तसेच विनाकारण याचिका सादर करुन न्यायालयाचा वेळ वाया घालविल्यामुळे ईडीला 1 लाख रुपयांचा दंड केला. ही रक्कम एक महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आधीन करावी, असाही आदेश दिला.