Tarun Bharat

कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंचे ट्विट; म्हणाले, विचारांचा विजय…

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कोर्टाच्या आजचा निर्णयानंतर कायदेशीर चाचपणी सुरू झाली आहे. भाजपात अविश्वास ठराव मांडण्या बाबत चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाची बैठक सुरू झाली आहे. ठाकरे सरकारवर अविश्वास ठराव आणण्याची या बैठकित चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये त्यांच्यासोबत सल्लागार तसेच वकिलांची टीम देखील आहे. दरम्यान कोर्टाचा दिलासा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..! असल्याचे म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी यासोबत आणखी दोन ट्विट केले आहेत. ज्यामध्ये मंत्री शंभुराजे देसाई यांचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात देसाई म्हणतात, यासाठी ५ कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थ राज्यमंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री – अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले नाहीत अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- शिवसेनेतल्या दोन गटातला संघर्ष आहे, भाजपचा संबंध नाही- चंद्रकांत पाटील

एकनाथ शिंदे यांनी म्हटलयं की, आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाज करा. आमची भुमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्व शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी माझी विनंती आहे असेही ते म्हणाले.

Related Stories

लॉक डाऊन 2 : गृहमंत्रालयाकडून गाईडलाईन जारी

prashant_c

राज्यात तुरळक पावसाचा इशारा

datta jadhav

ममता बॅनर्जींचे अभिनंदन करत राज ठाकरे म्हणाले…

Abhijeet Shinde

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी एक लाख कोरोना योद्धा निर्माण करण्यात येणार – पीएम मोदी

Abhijeet Shinde

वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करु नका; उध्दव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Rohan_P

न्यूझीलंड देश झाला कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!