Tarun Bharat

सर्वोच्च न्यायालयाचे थेट प्रक्षेपण 27 पासून

Advertisements

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठांसमोरची सुनावणी आता सर्वसामान्यांना टीव्ही किंवा सोशल मीडियावरुन थेट पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेच तसा निर्णय घेतला असून तो 27 सप्टेंबरपासून प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय पेचप्रसंगावरची सुनावणीही आता थेट पाहणे शक्य होणार आहे. हा निर्णय सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांच्या नेतृत्वात झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. 26 ऑगस्टला एका सुनावणीचे थेट प्रक्षेपण वेबकास्ट पोर्टलवरुन करण्यात आले होते. त्यावेळी एन. व्ही. रमणा हे सरन्यायाधीश होते. आता त्यावेळी घेतलेला निर्णय लागू होत आहे.

26 ऑगस्टलाच न्या. रमणा निवृत्त झाले होते. पण त्यांनी त्यांच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी हा नवा प्रारंभ केला होता. आता सध्याचे सरन्यायाधीश लळीत यांनी या निर्णयाचा विस्तार केला असून सर्व घटनापीठांसमोर चालणाऱया प्रकरणांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

टप्प्याटप्प्याने प्रक्षेपण होणार

प्रारंभी केवळ घटनात्मक आणि राष्ट्रीयदृष्टय़ा महत्वाच्या प्रकरणांच्या सुनावणींचे थेट प्रक्षेपण केले जाईल. काही काळानंतर सर्वच सुनावणींचे प्रक्षेपण थेट करण्याची सर्वोच्च न्यायालयाची योजना आहे, असे स्पष्ट करण्यात आले. थेट प्रक्षेपणाची मागणी 2018 पासूनची आहे. आता ती पूर्ण होत आहे, असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिसून येत आहे.

Related Stories

देशातील सर्वात मोठ्या विमानतळासाठी स्वित्झर्लंडच्या झुरीच कंपनीशी करार

datta jadhav

दिल्लीत कोरोनाचा उद्रेक : सीबीएसई परीक्षा रद्द करा; केजरीवाल यांची मागणी

Rohan_P

संसदेत या, 1962 पासूनची चर्चा करुया!

Patil_p

वाराणसीमध्ये आणखी 18 नवे कोरोना रुग्ण

Omkar B

रथावर शाह, व्हिलचेअरवर ममता

Patil_p

मुख्यमंत्री येडियुराप्पांचे गृहकार्यालय सीलडाऊन

Patil_p
error: Content is protected !!