मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या जामीनाला आव्हान देणारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे अनिल देशमुखांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मनी लॉंडरींग प्रकरणात तुरूंगात असलेले अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला प्रतिसाद देत उच्च न्यायालय़ाने देशमुखांना जामिन मंजूर केला होता. या जामीना विरोधात आव्हान देत ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. देशमुख हे मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असून त्यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय CBI) कडून चौकशी सुरू आहे.


previous post
next post