अमीषा पटेलला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
नवी दिल्ली
झारखंडमधील कनिष्ठ न्यायालयाकडून बजावण्यात आलेल्या समन्सप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला आहे. फसवणूकप्रकरणी गुन्हेगारी कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी न्यायाधीश बी.आर. गवई अन् पी.एस. नरसिंह यांनी अभिनेत्रीकडून दाखल याचिकेवर झारखंड सरकारला नोटीस बजावली आहे. निर्माते अजय कुमार सिंह यांनी अमीषा विरोधात फसवणुकीची तक्रार केली होती.