Tarun Bharat

शहनवाज हुसैन यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते शहनवाज हुसैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी मोठा दिलासा मिळाला आहे. 2018 मधील कथित बलात्काराप्रकरणी शहनवाज हुसैन यांच्या विरोधात एफआयआर नोंद करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱया शहनवाज यांच्या याचिकेवर नोटीसही जारी केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी शहनवाज हुसैन यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला होता. 2018 मध्ये त्यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. या आदेशाच्या विरोधात शहनवाज यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. स्वतःवरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा शहनवाज यांनी केला आहे.

भाजप नेत्यावर दिल्लीतील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.  12 एप्रिल 2018 रोजी एका फार्म हाउसमध्ये गुंगी आणणारे औषध पाजून बलात्कार करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आशा मेनन यांच्या खंडपीठाने एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला होता.

Related Stories

नौसेनेचे ग्लायडर कोसळले; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

datta jadhav

लॉकडाऊनचा फटका इस्रोलाही; 10 महत्वकांक्षी प्रकल्प रखडले

datta jadhav

अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही : शरद पवार

Tousif Mujawar

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात 1 जुलैपासून सुरू होणार ओपीडी सेवा

Tousif Mujawar

वाळवंटात खड्डय़ांमधील पाण्यावर अवलंबून लोक

Patil_p

आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील: चंद्रकांत पाटील

Archana Banage