तरुण भारत

सुरजची आत्महत्या नव्हे हत्या

पाचगणी / प्रतिनिधी :

जावळी तालुक्यातील ओझर येथील एका दलित कुटुंबातील सूरज शिवाजी चव्हाण (वय 22) या युवकाची आत्महत्या नसून, त्याची हत्या केली असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीय गौतम चव्हाण व शारदा गमरे व जावळी तालुका आरपीआय अध्यक्ष एकनाथ रोकडे व कार्यकर्त्यांनी मेढा पोलीस स्थानकांमध्ये निवेदन देऊन केला आहे.

Advertisements

यासंदर्भात अर्जात नमूद केल्याप्रमाणे ओझरे येथील दलित कुटुंबातील युवक सुरज शिवाजी चव्हाण हा गावातच घरगडी म्हणून कामाला होता.
काही प्रकारानंतर युवक सुरज चव्हाण याला त्याच घरातील कुटुंबीय व गावातील काही युवकानी बेदम मारहाण केली व त्यानंतर त्या कुटुंबाला देखील दमदाटी करत मारून टाकण्याची भाषा केली होती, असा आरोप सुरजच्या कुटुंबानेही केला आहे. दरम्यान, 2 एप्रिल रोजी सदर सुरज शिवाजी चव्हाण याचा मृतदेह गावातीलच हद्दीत एका झाडाला दोरीच्या साह्याने फास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना दुसऱ्या दिवशी मेढा पोलिस स्थानकामध्ये आत्महत्या म्हणून नोंद झाली. मात्र त्यानंतर कुटुंबियांनी यासंदर्भात पूर्णतः झालेल्या प्रकाराची पूर्ण गावातून माहिती घेतल्यानंतर व जावळी तालुका आरपीआयचे अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालून सखोल माहिती घेतल्यानंतर सुरत शिवाजी चव्हाण याची आत्महत्या नसून त्याची हत्या केली असल्याचे संशय व्यक्त केला आहे. मेढा पोलीस स्थानकामध्ये यासंदर्भात सुरज शिवाजी चव्हाण याची आत्महत्या नसून त्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्या असल्याचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे
या प्रकरणी तात्काळ तात्काळ खूनाचा गुन्हा दाखल करून संशयितांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.

याकामी टाळाटाळ झाली तर सातारा जिल्ह्यात एका दलित कुटूंबातील युवकाला निर्दयीपणे त्याची हत्या केली व अद्यापही त्याच्या मारेकर्‍यांना ताब्यात घेतले नसून जनप्रक्षोभ संपूर्ण समाजामध्ये निर्माण झाला होईल, असा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे. जोपर्यंत संबंधित मारेकऱ्यांना अटक करत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सदर मृत युवकांच्या कुटुंबीयांनी व जावळी तालुका आरपीआयचे अध्यक्ष एकनाथ रोकडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन आरपीआयचे अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी पत्रकारांना दिले असून 12 तासाच्या आत संबंधित आरोपींना अटक करावी असा अल्टीमेटम देखील प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे सुरज चव्हाण यांची आत्महत्या की हत्या यासंदर्भात पोलीस तपास कशा पद्धतीने करतात याकडे देखील आता आरपीआय चे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे. यामध्ये तपासात कोणताही कसूर झाला तर झालेल्या सर्व भविष्यातील घटनांना प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देखील आरपीआयचे अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी दिला आहे. यासंदर्भात सदर युवकाचा झालेला खून यावर सीबीआयची चौकशी व्हावी अशी मागणी देखील अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी केली आहे.

Related Stories

सातारा शहरात कोरोनाचा उद्रेक

Patil_p

लसीकरणातील वशिलेबाजीत पोलिसांचा हस्तक्षेप

Patil_p

सुरक्षेच्या कारणास्तव मुद्रांक विक्री आठ दिवस बंद

Abhijeet Shinde

थंडीचा जोर वाढल्याने स्वेटर खरेदीसाठी गर्दी

Patil_p

अकरानंतर कराडात शुकशुकाट

Patil_p

विकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!