Tarun Bharat

सुरेश देसाई यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

Advertisements

वार्ताहर /नंदगड

कर्नाटक राज्य वन निगमची स्थापना होऊन 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बेंगळूर विधानसभा सभागृहात निगमचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात खानापूर तालुका ग्रामपंचायतीचे माजी उपसभापती व कर्नाटक राज्य वन निगमचे संचालक सुरेश देसाई यांचा राज्यपाल गेहलोत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सुवर्ण महोत्सवाच्या समारोप समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत, अरण्य खात्याचे अप्पर मुख्य सचिव जावेद अख्तर, वन निगमच्या अध्यक्षा तारा अनुराधा, उपाध्यक्ष रेवणप्पा कोळगी, संचालक सुरेश देसाई, भाग्यवती अमरीश, दीपक कुमार, पी. के. राजगोपाल, प्रदीप, वन निगमच्या व्यवस्थापकीय संचालिका राधादेवी, अरण्य खात्याचे मुख्य प्रधान सचिव राजकिशोर सिंग आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल गेहलोत म्हणाले, पर्यावरणात निरंतर उष्णता वाढत आहे. त्यामुळे समस्यांत वाढ होत आहे. वनांचे महत्त्व ओळखून आपल्या पूर्वजांनी त्यांचे संरक्षण केले आहे. वनांमुळे आम्हाला ऑक्सिजन तर मिळतोच शिवाय वनौषधीही उपयोगी पडतात. वनांचे संरक्षण व संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गेल्या पन्नास वर्षात वन निगमचा मोठय़ा प्रमाणात विकास झाल्याबद्दल निगमच्या अध्यक्षा व संचालकांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याच्या विविध भागांतून अनेक शेतकरी, वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

वन निगमचे संचालक सुरेश देसाई खानापूर तालुक्मयातील निट्टूर गावचे असून त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार होणार असल्याने यावेळी तालुक्मयातील अनेकांनी खास उपस्थिती दर्शविली होती.

Related Stories

अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईवर चर्चा करा

Amit Kulkarni

मच्छे संभाजीनगरातील समस्या सोडवा

Amit Kulkarni

मण्णूरमध्ये म. ए. समिती उमेदवारांच्या प्रचाराला प्रारंभ

Patil_p

निवडणूक अधिकारीच पार्टी करतात तेव्हा…

Omkar B

शनिवारी 190 जणांना कोरोना; एकाचा मृत्यू

Rohan_P

बळ्ळारी नाल्याची कथा-शेतकऱयांच्या व्यथा

Omkar B
error: Content is protected !!