Tarun Bharat

हातपाय नसतानाही करते सर्फिंग

10 वर्षीय जेडची कौतुकास्पद कामगिरी

स्वतःच्या दिव्यांगत्वाला बाजूला सारून एक मुलगी हसतमुखपणे जीवन जगत आहे. ही मुलगी लवकरच डिसेंबरमध्ये होणाऱया युएस सर्फिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारी सर्वात कमी वयाची ऍथलिट ठरणार आहे. विशेष म्हणजे या मुलीला हात-पाय नाहीत.

स्कॉटलंडच्या एबर्डीनशायरमध्ये राहणाऱया 10 वर्षीय जेड एडवर्डला वयाच्या दुसऱया वर्षी मेनिंगोकोकल सेप्टिसीमिया नावाचा जीवघेणा आजार झाला होता. या आजारामुळे तिचे हात अन् पाय कापावे लागले होते. जेड आता अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात होणाऱया जागतिक पॅरा सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज आहे.

सर्फिंग करण्यात आनंद

सर्फिंग करण्यात मला मोठा आनंद मिळतो. पाण्यात राहणे मला पसंत आहे. पाणी माझ्यासाठी एक आनंदाचे ठिकाण आहे. पाण्यात मला भीती वाटत नाही आणि थंडीही जाणवत नाही. भविष्यात होणारी जागतिक स्पर्धा माझ्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी असल्याचे जेड एडवर्डने म्हटले आहे.

नवे शिकत राहण्याचा ध्यास

6 महिन्यांपर्यंत बेड रेस्ट नंतर व्हीलचेअरच्या मदतीने जगणाऱया जेडने हार मानलेली नाही. तिने सर्फिंग करणे शिकले, प्रोफेशनल्सच्या मदतीने तिने बोर्डवर शरीराचे संतुलन साधणे आत्मसात केले. सर्फिंगने तिला मुक्ततेची जाणीव करून दिली आहे. सर्फिंग करताना तिला मोठा आनंद होते. ती नेहमीच काही तरी नवे शिकू इच्छित असे उद्गार तिचे वडिल प्रेजर यांनी काढले आहेत.

पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार

जेडचे हातपाय कापावे लागतील असे डॉक्टरांनी सांगितल्यावर माझ्या पायाखाली जमीनच सरकली होती. आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला काहीच सुचत नव्हते. परंतु जेड जिवंत राहणार याचाचा दिलासा होता. जेडने कधीच हार मानली नाही. जेड आता 2028 च्या परॉऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ इच्छिते असे 47 वर्षीय प्रेजर यांनी म्हटले आहे. जेड ये-जा करण्यासाठी एका इलेक्ट्रिक चेअरचा वापर करते. कधीकधी स्केटबोर्डवर बसून ती शाळेत जात असते.

Related Stories

चीनला धडा शिकविणार : डोनाल्ड ट्रम्प

Patil_p

जगाला पीडीएफची भेट देणारा काळाच्या पडद्याआड

Patil_p

हा माणूस सत्तेवर राहू शकत नाही!

Patil_p

सौदीत स्थानिक पर्यटन सुरू होणार

datta jadhav

नव्या इमारतींमध्ये इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉइंटची सक्ती

Patil_p

अमेरिका : कोलोराडोच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 ठार

datta jadhav