लंडन / वृत्तसंस्था
इंग्लिश महिला संघाची कर्णधार हिदर नाईटवर कमरेची शस्त्रक्रिया करण्यात आली असून यामुळे ती अनिश्चित कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर असेल. सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध होणाऱया मालिकेत आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये ती सहभागी होणार नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले. अलीकडेच द हंड्रेड स्पर्धेलाही तिला मुकावे लागले. या स्पर्धेत ती लंडन स्पिरिट टीमचे नेतृत्व भूषवणे अपेक्षित होते. हिदर नाईटला दि. 21 जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. हिदर नाईटच्या गैरहजेरीत इंग्लिश संघाचे नेतृत्व नॅट स्किव्हरकडे सोपवले गेले आहे.