Tarun Bharat

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

बारा लाखांचा इनाम असलेल्या गडचिरोलीतील दोन जहाल नक्षलवाद्यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम, आणि माधुरी ऊर्फ सुमन राजू मट्टामी अशी या दोन जहाल नक्षलवाद्यांची नावे आहेत.

रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम हा 2012 ते मार्च 2022 पर्यंत भामरागड एरीया टेक्नीकल दलामध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. त्याच्यावर 1 खून, 1 चकमक आणि इतर 1 असे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. रामसिंग हा मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी येथील चकमकीत सहभागी होता. तर माधुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी ही फेब्रुवारी 2013 ते एप्रिल 2022 पर्यंत पेरमिली दलामध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर 4 खून, 21 चकमक, 7 जाळपोळ आणि इतर 5 असे एकूण 37 गुन्हे दाखल आहेत. ती मौजा वेळमागड, कसनासुर व माडवेली चकमकीमध्ये सहभागी होती.

नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल म्हणाले, जे नक्षलवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल. नक्षलवाद्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

Related Stories

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पाठवा – मुख्यमंत्री

Archana Banage

बनगरवाडीत लाखो रुपयांचा गांजा जप्त

Patil_p

दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये 800 डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह

Abhijeet Khandekar

मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी ; निर्बंध कडक करण्याचा इशारा

Archana Banage

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे,संतोष धुरींना न्यायालयाचा दिलासा

Archana Banage

”यास”चा धोका ओळखत ममतांचा मुक्काम नियंत्रण कक्षातच

Archana Banage
error: Content is protected !!